Fire News : खेडमध्ये सिलेंडरच्या स्फोटात घर जळाले; पुणे शहरात भीषण अग्नितांडव, एकाच दिवशी तीन आगीच्या घटना

Pune : खेडमध्ये घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किट व सिलेंडरच्या स्फोटामुळे घराला भयंकर आग लागली. होती. खेडमधील बहिरवेली नं.१ येथे घराला रात्री दिडच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती. घराला लागलेल्या भीषण आगीत सर्व जळून खाक झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पुणे शहरात काल भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं. शहरामध्ये एकाच दिवशी तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. उंड्री, बी. टी. कवडे रस्ता आणि मुंढवा या तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. आपण या घटनांविषयी सविस्तर पाहू या. आग लागल्याची पहिली घटना उंड्रीमध्ये घडली तर दुसरी घटना बी. टी. कवडे रस्त्यावर घडल्याचं समोर आलं आहे. आगीची तिसरी घटना मुंढवा भागात घडली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु तिन्ही घटनांमध्ये आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळतेय.

Pune : पुणे जिल्ह्यावर पाणी संकट कायम; २६ धरणांमध्ये मिळून ५६.३१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

मुंढवा येथील बंगल्यातील किचनला आग लागल्याची घटना घडली. याआगीमध्येआई आणि मुलगा जखमी झाला आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. या आगीत अंजली ईश्वर सकत (वय-५८), जतिन ईश्वर सकत (वय-३२) असे जखमी झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे.

शहरात पहिली घटना उंड्री येथे घडली होती. होले वस्ती येथील पञ्याच्या शेडमध्ये एक 'एम के स्क्रॅप सेंटर' आहे. तेथील येथील भंगार मालाच्या साठ्याला आग लागली होती. या घटनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

आग लागल्याची दुसरी घटना बी. टी. कवडे रस्त्यावरील सोलेश पार्क सोसायटी येथील आवारात घडली होती. या आवारातील महावितरणच्या २०० के व्ही पॅनल बोर्ड व शेजारीच असणाऱ्या दोन डीपीने पेट घेतला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याच्या मारा करत आगीवर नियंत्रण मिळवत धोका दुर केला.

तिनही घटनास्थळी अग्निशमन दल तात्काळ पोहोचले होते. त्यांनी बचावकार्य करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. पुणे शहरात तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply