Pune Fire : पुण्यातील कर्वेनगरजवळील दुधाने लॉन्स जवळ गॅरेजला आग

Pune Fire : कर्वेनगरमधील नदीपात्रालगत असलेल्या भंगारच्या दुकानाला भीषण आग लागली. त्यामुळे आग पसरत असून आगीने रौद्ररूप धारण केलं आहे. परिणामी धुराचे लोट परिसरात सर्वदूर पसरले आहेत.

दुधाणे लॉन्स या परिसरात भंगारची दुकाने असून येथील सामानाला आग लागली. या ठिकाणी जुने टीव्ही, फ्रिज, आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. या आगीत फ्रिजचे कॉम्प्रेसर ला आग लागत असून ते फुटण्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे मोठ्याने परिसरात आवाज देखील येत आहे.

आगीची घटना कळताच सिंहगड रस्ता, वारजे, कोथरूड, एरंडवणा येथील अग्निशामंदलाचे पंप जागेवर पोहोचले आहेत. यासोबतच पीएमआरडीए कडील टँकर देखील घटनास्थळी पोहोचले असून आज वीजवण्याचे काम सुरू आहे.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी अनेक अनाधिकृत दुकाने असून येथील भंगार सामानांना ही आग लागली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी नसल्याचे सध्या वृत्त आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *