Pune Exclusive : ड्रग्ज प्रकरणी नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी; गुन्हे शाखेची पहाटेपासून कारवाई, १० पथके तैनात

Pune Exclusive : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात अमली पदार्थांचा वावर वाढला आहे. याप्रकरणी आता पुणे पोलीस अलर्टमोडवर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पहाटेपासून कारवाई सुरू केली आहे. पोलीसांनी नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी सुरू केली आहे. आज पहाटेपासूनच ही कारवाई केली जात आहे. 

पुणे पोलीस नायजेरीयन ड्रग्ज पेडलर आणि ड्रग्ज पुरवणाऱ्या टोळीवर कारवाई करत आहेत. ड्रग्स पुरवणाऱ्या नायजेरीयन नागरिकांच्या निवासस्थानी पोलीस छापेमारी करत आहेत. त्यामुळे शहरात एकच दाणादाण उडाली आहे. नायजेरीयन गँगच्या घरांवर पोलीस पहाटेपासूनच धाड टाकत आहेत.

Dhule Crime News : मद्य वाहतुक प्रकरणी धुळे एलसीबीकडून तिघांना अटक, 36 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त

नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी

पुणे पोलिसांनी पहाटेपासून शहरातील विविध भागात कारवाई सुरू केली आहे. कोंढवा, हडपसर, कात्रज, वानवडी या परिसरात असलेल्या नायजेरीयन नागरिकांच्या निवासस्थानावर पोलीस कारवाई करत आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे १० पथके ही कारवाई करत आहेत. नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी सुरू आहे.

मागील काही दिवसांपूर्वी पुणे शहरात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. यामुळे संपूर्ण राज्याला हादरवून टाकले होते. याशिवाय या ड्रग्ज प्रकरणाचे नॅशनल इंटरनॅशल कनेक्शन असल्याचं देखील समोर  आलं होतं. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी संपूर्ण देशभरात छापे टाकले होते. कोट्यवधी रूपयांचं ड्रग्ज देखील जप्त केलं होतं.

पुणे ड्रग्ज प्रकरण

पुणे शहरात अमली पदार्थ बनविण्याचा कारखाना असल्याचं देखील फेब्रुवारी महिन्यात समोर आलं होतं. पोलिसांनी अनिल साबळे आणि युवराज भुजबळ या दोघांना अटक केली होती. त्यांनी कुरकुंभ येथे एमडी बनविण्याचा कारखाना सुरू केला होता. पुणे पोलिसांनी यावर कारवाई करत कंपनी सील केली होती.

पुणे ड्रग्ज प्रकरण्याचं देशभर नेटवर्क पसरलेलं आहे. पुण्यात आणि इतर ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्स मिळून आले होते. अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आरोपींनी टोपण नावे तयार केली होती. आरोपींना ३ महिन्यात २००० किलो एमडी बनवण्याचं टार्गेट दिल्याचं समोर आलं होतं.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply