Pune : ESIC उपप्रादेशिक कार्यालय पुणे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Pune : 14 एप्रिल 2023 रोजी ई एस आय सी उपप्रादेशिक कार्यालय पुणे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम ESIC SC ST अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने आयोजित केलेल्या भीम जयंती महोत्सव 2023 चा भाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यालय प्रमुख तथा उपप्रादेशिक कार्यालय पुणेचे प्रभारी उपसंचालक हेमंतकुमार पाण्डेय होते. इतर प्रमुख पाहुण्यांमध्ये ईएसआयसी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बन्सल, उपअधीक्षक डॉ. पांडा, उपसंचालक वित्त श्री. पाटील, उपसंचालक श्री. युमनाम, सहाय्यक संचालक श्री. संदीप कुमार आणि संघटनेचे सचिव व सहायक संचालक श्री. सुनील देडे यांचा समावेश होता.

आधुनिक भारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान योगदानाचे स्मरण करून श्री.पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. श्री.पाण्डेय यांनी बाबासाहेबांच्या विविध क्षेत्रातील योगदानावर चर्चा केली, ज्यामुळे देशातील समाजवादी अर्थव्यवस्थेचा पाया घातला.तसेच वित्त आयोगाच्या स्थापनेतील बाबासाहेबांच्या योगदानावरही त्यांनी आपले विचार मांडले.तसेच ते म्हणाले की, बाबासाहेबांचे महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय याबाबतचे विचार आजही प्रासंगिक आहेत.

डॉ. बन्सल, डॉ. पांडा, श्री. पाटील, श्री. संदीप कुमार यांनीही बाबासाहेबांचे कार्य आणि देशासाठी दिलेले योगदान याविषयी मनोगत व्यक्त केले. ईएसआयसीच्या निर्मितीत बाबासाहेबांचे योगदान सविस्तर विशद करताना डॉ.बंसल म्हणाले की, आधुनिक भारताच्या राष्ट्रनिर्मात्यांमधील बाबासाहेब हे एक मोठे नाव आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.वैभव दुधमल यांनी केले. या कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी मिरेंद्र भोसले, मच्छिंद्र दिवटे,वैभव दुधमल, गोकुळ बेले, मनीष आडे, श्रीमती भारती अवघडे, विशाल इंगोले, अभिजित कौराती हे उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान सुमती बालवन अनाथ आश्रमातील अनाथ मुलींना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले तसेच कार्यालयातील सुरक्षा कर्मचारी व सफाई कामगारांच्या मुलांना नोटबुकचे वाटप करण्यात आले.भीम जयंती महोत्सव 2023 चा भाग म्हणून विविध क्रीडा स्पर्धा व खेळांचे आयोजन करण्यात आलेहोते.क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. श्री.गोकुळ बेले यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली व कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

उपप्रादेशिक कार्यालय पुणे येथे भीम जयंती महोत्सव 2023 हा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात आला, ज्या अंतर्गत विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित केले गेले.ज्याचे उद्घाटन उपसंचालक श्री राजेश सिंह आणि श्री चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते 31 मार्च रोजी करण्यात आले

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply