Pune Drought News : पुणे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी घोषित; 'या' तालुक्यांचा यादीत समावेश

Pune Drought News : राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. नोव्हेंबर महिन्यामध्येच अनेक भागात पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील अनेक भागात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. आता पुणे जिल्ह्यातील स्थिती देखील कठीण बनत आहे. पुणे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले आहेत. 

राज्यभरातील दुष्काळसदृष परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक काही जिल्ह्यात दुष्काळ घोषित केला आहे. तर पुणे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात यापूर्वी केंद्राच्या निकषानुसार बारामती, पुरंदर हे दोन तालुके पूर्णतः तर इंदापूर, शिरूर आणि दौंड तालुक्यात अंशतः दुष्काळी जाहीर करण्यात आले होते.

Solapur Tuljapur Highway Accident News : सोलापूर - तुळजापुर महामार्गावर एसटी खड्ड्यात काेसळली, प्रवासी जखमी

राज्य सरकारने जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांचा दुष्काळाच्या यादीत मुळशी, वेल्हे हे दोन तालुके वगळता अन्य सर्व तालुक्यांमधील महसूल मंडळांचा समावेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी म्हणून घोषित झाले आहेत.

दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या ठिकाणी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा गावांचा समावेश करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत ७५ टक्के कमी पाऊस झाल्याने या गावांना टंचाईसदृश म्हणून जाहीर करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply