Pune Draught : पुणे जिल्ह्यात पारंपारिक दुष्काळ! शरद पवारांचं मुख्यंमत्र्यांना पत्र; म्हणाले, कायमचा...

Pune Draught : पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कायमच दुष्काळी परिस्थिती असते. यापार्श्वभूमीवर राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं आहे. यामध्ये त्यांनी या परिस्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्याचं आवाहन केलं आहे. पवारांनी पत्रात नेमक्या कुठल्या दुष्काळी भागाचा उल्लेख केला आहे जाणून घेऊयात.

लोकसभा निवडणुकीची सांगता झाल्यानंतर शरद पवार यांनी नुकताच १२ आणि १३ जून रोजी पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध तालुके आणि त्यातील गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या तिथल्या नागरिकाशी संवाद साधला त्यातून त्यांनी महत्वाची टिपणं तयार केली असून त्याद्वारे मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहतीच पत्र लिहिलं आहे.

Pune News : 71 म्हैशींचे प्राण वाचवून पाच ट्रकसह 60 लाखांचा मुद्देमाल जप्त; बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई

आपल्या पत्रात म्हणतात, पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यातील कमी पाऊस असलेल्या दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनान पुरदर उपसा सिंचन योजना, गुंतवणी प्रकल्प, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना जूस केल्या आहेत. पण या योजनांच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

दरम्यान, यावेळी इथल्या ग्रामस्थांशी चर्चेदरम्यान इथला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा वासाठी नागरिकानी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. या समस्यांबाबत प्रकल्प निहाय आणि गावनिहाय स्वतंत्र टिपण पत्रासोबत जोडल्याचे शरद पवारांनी म्हटल आहे. जिल्ह्यातील हा पारंपारिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

यासाठी मुख्यंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, मृदा व जलसंधारण मंत्री, पाणी पुरवठा मंत्री पाल्या उपस्थितीत मुंबईत गांभीर्यपूर्वक बैठकीचं आयोजन करण्यात यावं. तसंच या बैठकीला संबधित विभागाचे निव आणि लोकप्रतिनिधी यांना देखील बोलवण्यात याव, असही शरद पवारानी मुख्यमंत्र्याना लिहिलेल्या पत्रात मारल आह.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply