Deenanath Hospital : १० लाख स्वतःसाठी मागितले नव्हते; डॉ.सुश्रुत घैसासवर दाखल झालेला गुन्हा चुकीचा: IMA

Pune : दीनानाथ हॉस्पिटलमधील तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉ. घैसास यांना पाठिंबा दिलाय. डॉ. घैसास यांच्यावर दाखल करण्यात आलेला आरोप चुकीचा आहे. तसेच घैसास यांनी स्वत: साठी १० लाख रुपये मागितले नव्हते. ते पैसे रुग्णालयाला जाणार होते, त्यामुळे त्यांच्या पाठीशी आयएमए आहे, अशी प्रतिक्रिया आयएमएचे संचालक डॉ. सुनील इंगळे यांनी दिलीय.

इंडियन मेडिकल असोसिएशनकडून आज डॉ. सुश्रुत घैसास यांना पाठिंबा देण्यात आलाय. डॉ. घैसास यांना आम्ही कायदेशीर मदत देणार आहोत तसेच आम्ही कायदेशीर तज्ञांशी बोलणे झाले आहे. डॉ. घैसास यांनी सत्य परिस्थिती आम्हाला सांगितलीय. त्यांनी स्वतःसाठी पैसे घेतले नव्हते ते सगळे पैसे रुग्णालयालाच जाणार होते, असे स्पष्ट मत आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे यांनी मांडले आहे.

Pune : बांधकामांच्या पर्यावरण मंजुरीचा तिढा सोडविणार, ‘क्रेडाई’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

डॉ. सुश्रुत घैसास यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. मेडिकल निगलिजन्स कलम लावताना रुग्णावर उपचार झालाच नाही. डॉ. सुश्रुत घैसास यांनी उपचारच केले नाही. डॉक्टरांनी पुन्हा त्यांना बोलावले पण त्याआधीच ते निघून गेले. घैसास यांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, असं इंगळे म्हणालेत. याप्ररकरणी पुढील माहिती देताना आयएमएचे संचालक म्हणाले, या प्रकरणातील पहिला आणि शेवटचा अहवाल आमच्या हातात आलेला नाहीये.

२४ तास आधी एक अहवाल येतो त्यात डॉ. घैसास हे चुकीचे वाटत नाहीत. पण डॉ. घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय. दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे यांच्यावर उपचार झालेच नाहीत. डॉक्टर घैसास यांनी स्वतःसाठी पैसे भरायला सांगितले नाहीत. ते सगळे पैसे रुग्णालयाला जाणार होते. मुख्यमंत्री यांना आमचे सांगणे आहे की असे गुन्हे घडतात त्याची चौकशी नक्की करावी, पण लोकांनी कायदा हातात घेणे चुकीचे आहे.

डॉ. घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड असेल किंवा रुग्णालयासमोर आंदोलनं करणे चुकीचे असून मुख्यमंत्री यांनी याबाबत दखल घेणे गरजेचे असल्याचं डॉ. इंगळे म्हणालेत.

काही दिवसापूर्वी पु्ण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे ह्यांना प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. तनिषा भिसे ह्या भाजपचे आमदार अमित घोडके यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. तनिषा भिसे यांची प्रसूती जोखमीची होती. त्यावेळी रुग्णालयाच्या प्रशासनाने भिसे कुटुंबीयांकडे १० लाख रुपयांची मागणी केली होती. तर डॉ.घैसास तनिषा भिसे यांच्यावर उपचार करत होते. भिसे कुटुंबीयांकडून पैसे जमा न झाल्याने तनिषा भिसे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते.

त्यामुळे तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. पण त्यानंतर तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता. दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र उपचार करणारे डॉ. घैसास यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीचा असल्याचं आयएमएचे संचालक म्हणालेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply