Pune Dangerous Reel : रीलसाठी लटकले इमारतीला; कात्रज परिसरातील घटना, तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल

Pune Dangerous Reel : रील बनविण्यासाठी तरुणी एका तरुणाचा हात धरून एका इमारतीवरून लटकल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच, भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. एका बंद इमारतीच्या छतावरून तरुण- तरुणीने धोकादायकरीत्या रील बनवला आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरील कात्रज नव्या बोगद्याजवळील दरी पुलाजवळ या तरुणांनी रील शूट केला आहे. संगनमताने केलेला गुन्हा आणि अविचाराचे किंवा हयगयीचे कृत्य करून दुसऱ्याऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल तरुणांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एका जुन्या इमारतीवर हाताची पकड तपासण्यासाठी एक तरुणी तरुणाचा हात पकडून इमारतीवरून लटकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या दोघांसोबत तीन ते चार व्हिडिओग्राफरदेखील तेथे उपस्थित असल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट होते. रील तयार करण्याच्या नादामध्ये एका तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना नुकतीच छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. कारमध्ये बसून रील बनवत असताना तरुणी कारसोबत दरीत कोसळली. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला आहे. दौलताबाद परिसरातील सुलीभंजन येथील दत्तमंदिराजवळ ही घटना घडली होती. हा प्रकार ताजा असतानाच अत्यंत धोकादायकपणे रीलचे शूट करण्यात येत असल्याचा प्रकार कात्रज परिसरात घडला

Pune News : हांडेवाडीतील महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये

या तरुणांवर भादवि कलम ३४ आणि 33६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगनमताने अविचाराचे किवा हयगयीचे कृत्य करून दुसऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्यानंतर या कलमांनुसार गुन्हा दाखल होत असतो. तीन महिने तुरुंगवास आणि २५० रुपये दंड किंवा दोन्ही असे या गुन्ह्याच्या शिक्षेचे स्वरूप आहे हा गुन्हा जामीनपात्र असून, त्यात तडजोड करता येत नाही.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply