Pune Dam Water Level : पानशेत धरण ९१, तर वरसगाव ८२ टक्के भरले

खडकवासला : धरण परिसरात पावसाचा जोर कमी असून घाटमाथ्यावर पाऊस पडला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात कमी प्रमाणात वाढ होत आहे. दरम्यान पानशेत धरण ९१ तर, वरसगाव ८२ टक्के भरले आहे.

खडकवासला धरण भरल्यानंतर पानशेत व वरसगाव धरण परिसरात चांगला पाऊस पडला. कोकण घाटमाथ्यावर पावसात सातत्य राहिल्यास ही दोन्ही धरणे १५ ते २० दिवसांत पूर्ण भरतील. येत्या पंधरा दिवसांत होणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर पानशेत आणि वरसगाव धरणातून पाणी सोडण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी दिली.

पानशेत धरणात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्यावर जलविद्युत केंद्र (पावर हाऊस) आणि नदीमधून पाणी सोडण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Nitin Desai : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं नितीन देसाईंच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन

धरणाचे नाव - एकूण क्षमता - उपयुक्त पाणीसाठा - टक्केवारी (टीएमसी)

  • खडकवासला - १.९७ - १.८९ - ९५.५१

  • पानशेत- १०.६५ - ९.७१ - ९१.१६

  • वरसगाव - १२.८२ - १०.५२ - ८२.०५

  • टेमघर - ३.७१ - २.३५ - ६३.४४

  • चार धरणांतील एकूण क्षमता २९.१५ टीएमसी

  • आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा २४.४६ टीएमसी म्हणजे ८३.९२ टक्के

धरणाचे नाव - उपयुक्त पाणीसाठा - टक्केवारी - विसर्ग

  • मुळशी - २०.१६ - १७.३१ - ८५.८८ - १००० (सांडवा)

  • भामा आसखेड - ७.६७ - ६.०८ - ७९.२८ - ०

  • पवना - ८.५१ - ७.८८ - ९२.५६ - १४०० (पावर हाउस)



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply