Pune Dahi Handi 2023 : दहीहंडी उत्सवामुळं पुण्यातील वाहतुकीत बदल; जाणून घ्या कोणत्या मार्गानं कसं आणि कुठे जाल?

Pune Dahi Handi 2023 : पुणेकरांना दहीहंडीचा उत्सव रात्री १० वाजेपर्यंत साजरा करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकरच्या आदेशाचं पालन करण्यात येईल, असं शहर पोलिसांनी स्पष्ट केलंय. पुणे शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी उत्सवाला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत डॉल्बीच्या वापराला बंदी आहे. 

तर राज्य सरकारकडून दहीहंडी उत्सवासाठी वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुणे शहरात रात्री १० वाजेपर्यंतच दहीहंडी उत्सवाला परवानगी देण्यात आलीय. दरम्यान या उत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आलाय. दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहीहंडी उत्सव मंडळांकडून दहीहंडी साजरी केली जाणार आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरा केली जाते.

Maratha Reservation: मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिल्यास देशभरात आंदोलनं करू; ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा

मजुर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजुर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई, महाराष्ट्र साहित्य परिषद, नवी पेठ या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पुण्यात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आलाय.

असा असेल बदल

पुण्यातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक उद्या संध्याकाळी बदलली जाणार आहे. बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक होणार आहे. मजूर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजूर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई अशा रस्त्यांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्ग वापरावा. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटला जाणार्‍या वाहनांना स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्यानं खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता किंवा लाल बहादूर शास्त्री रस्त्याने इच्छितस्थळी जाता येईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply