Pune Crime : औंधमधील हत्याकांड ; व्यवसायात तोटा झाल्यामुळे बायको आणि मुलाची हत्या करत अभियंत्याने स्वत:लाही संपवलं; पोलिस तपासात हे धक्कादायक कारण समोर

Pune Crime : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. पुण्यातील नामांकित कंपनीत काम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरने आपली पत्नी आणि ८ वर्षाच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:लाही संपवून टाकलं. पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून पोलिसांत तपासात हत्येचं मोठं कारण समोर आलं आहे. 

सुदिप्तो गांगुली असं 44 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीयरचं नाव आहे. सुदिप्तो पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरीला होते. ते पश्चिम बंगालचे असल्याचीही माहिती समोर येत आहे. सुदिप्तो यांनी पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलाची आधी हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नी आणि मुलाच्या चेहऱ्याला प्लास्टिक पिशवी गुंडाळून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुदिप्तो यांच्या पत्नीचा भावाने अनेकदा घरी फोन केले. मात्र कुणीही फोन उचलला नाही. त्यानंतर संशय आल्याने त्याने पोलिसात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांना अधिक तपास केला त्यावेळी हा प्रकार उघडकीला आला. नेमकी हत्या आणि आत्महत्या कशामुळे केली? याचा अधिक तपास चतुर्श्रुंगी पोलिसांनी केला.

व्यवसायात तोटा. मित्रांकडून ३० लाखांची उधारी; आर्थिक तणावातून अभियंत्याने हे कृत्य केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. व्यवसायात तोटा झाल्यामुळे पत्नी, मुलाचा खून करून आयटी अभियंत्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. दरम्यान, त्याने दोन मित्रांकडून ३० लाख रुपये उधार घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

दिप्तोची पत्नी आणि मुलाचा चेहरा प्लॅस्टिकच्या रॅपरने बांधलेला होता. सुदिप्तोने पत्नी आणि मुलाला झोपण्यापूर्वी गुंगीचे औषध दिले असावे. तसेच, चेहऱ्याला रॅपर बांधल्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मात्र, त्यांचा शवविच्छेदन अहवाल राखून ठेवण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply