Pune Crime : पार्टटाईम जॉब महागात पडला; सायबर गुन्हेगारांकडून पुण्यातील व्यक्तीला ४४ लाखांचा गंडा

 Pune Crime : पार्टटाइम जॉबचे आमिष पुण्यातील व्यक्तीला महागात पडलं आहे. पार्टटाईम जॉब देण्याच्या बहाण्याने व्यक्तीची तब्बल ४४ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ऑनलाइन टास्कचे आमिष दाखवून तरुणाला गंडा घालण्यात आला आहे.

पार्टटाइम जॉबमध्ये ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला देण्याच्या आमिषातून या तरुणाची सुमारे ४४ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात १५ ते २० जानेवारीदरम्यान हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका ४६ वर्षीय व्यक्तीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

Mumbai : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले; वर्षा गायकवाड यांच्यासह ६०-७० पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीला एका अनोळखी मोबाईलवरून व्हॉटसॲपवर मेसेज आला. आरोपींनी फिर्यादीला टेलिग्राम ॲपवर पार्टटाइम जॉबसाठी लिंक पाठवली आणि त्यात गुगल मॅपवरील हॉटेलला रिव्हिह्यू रेटिंगचे टास्क दिले.

आरोपींनी फिर्यादीच्या खात्यात काही पैसे जमा केले आणि आणखी जास्त रकमेचे प्रलोभन दाखवले. टास्क पूर्ण करण्यासाठी फिर्यादीला वेळोवेळी बॅंक खात्यात ४३ लाख ८२ हजार रुपये भरण्यास सांगितले.

परंतु कोणताही परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्याच धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply