Pune Crime : पुणे पोलिसांच्या आदेशाला गुंडांची केराची टोपली? सोशल मीडियावर दहशत पसरवणारे रिल्स अजूनही सुरूच

Pune Crime : पुणे पोलीस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर लगेच त्यांनी शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केलीय. पोलीस आयुक्तालयात मंगळवारी शहरातील सराईत गुन्हेगारांची परेड घेण्यात आली होती. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून सज्जड दम देखील देण्यात आला होता.

परंतु, पुणे पोलिसांच्या आदेशाला या सराईत गुन्हेगारांनी डावलल्याचं दिसत आहे. गुन्हेगारांच्या परेड नंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरुच आहे. पुणे पोलिसांच्या आदेशाला भाई लोकांच्या कार्यकर्त्यांनी केराची टोपली दाखवल्याचं सुरूच आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स टाकणे अद्यापही सुरू आहे.

Pune : पुण्यातील कोयता गँगची दहशत मोडणार; पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी दिले स्पष्ट संकेत

रिल्सद्वारे दहशत पसरवण्याचा प्रयत्न

गुन्हेगार , गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स व्हिडीओ, गुंडांनी किंवा गुंडांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट करायचे नाहीत, अशी सक्त ताकीद पुणे पोलिसांनी दिली होती. पुणे पोलिसांनी हे जाहीरपणे सांगून काही तास उलटायच्या आतच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गुंड निलेश घायवळ याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड झाल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी दिली होती ताकीद

कोणताही गुन्हा करायचा नाही. गुन्हेगारीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही. बेकायदेशीर कृत्यात सहभागी व्हायचं नाही, सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा रील्स टाकायचे नाहीत. राहण्याचा पत्ता किंवा मोबाईल बदलल्यास त्याची माहिती पोलीस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटला हजर राहून कळवावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला होता.

नीलेश घायवळ कोण आहे

नीलेश घायवळ हा पुण्यातील गँगस्टर म्हणून ओळखा जातो. त्याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत होती. घायवळविरूद्ध खून, खूनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, मारामारी, दुखापत करणं, बेकायदा शस्त्र बाळगणं, खंडणीसाठी अपहरण असे एकूण १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या टोळीच्या वर्चस्ववादातून शहर आणि जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.

पुणे पोलिसांच्या आदेशाला या सराईत गुन्हेगारांनी काही तासांच्या आतच केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांत खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply