Pune Crime News : मुंबई पुणे हायवेवर गोव्याची बनावट दारू जप्त, 60 हजार बाटल्या घेतल्या ताब्यात, किंमत 21 लाख

Pune Crime News : पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारुविरोधात मोहीम राबवली असून त्यांनी मोठी कारवाई केली आहे. जुना मुंबई पुणे हायवेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूच्या 60 हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. 600 बॉक्समध्ये लपवण्यात आलेल्या बनावट मद्याची किंमत 21 लाख रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येतेय. जुन्या मुंबई पुणे मार्गावर असलेल्या मामुर्डी गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही धडक कारवाई केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी रोजी एक ट्रक जुना मुंबई पुणे हायवे रोडवर, मामुरडी गावाजवळ येथून जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार, सापळा रचून अधिकारी कर्मचाऱ्यांनी तो ट्रक अडवला आणि त्याची तपासणी केली. या ट्रक मध्ये गोवा राज्यात निर्मित बनावट देशी दारू रॉकेट असल्याचं समोर आले. पोलिसांनी संत्रा 90 मि.ली. क्षमतेच्या 60,000 बाटल्या (600 बॉक्स) एव्हढा मुद्देमाल मिळून आला. या मुद्देमालाची किंमत तब्बल 21 लाख रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात 15 लाखाच्या वाहनासह एकूण 36 लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

Pune News : पुणे जिल्ह्यात तिसरी महापालिका तयार होणार? प्रशासकीय हालचालींना वेग, कसं असेल कार्यक्षेत्र?

गोव्यात जाऊन धडक कारवाई, 38 लाखांचा मुद्देमाल जप्त

जप्त बनावट देशी मद्य हे गोवा राज्यातील वडावल या ठिकाणी एका पत्र्याच्या गोडावूनमध्ये तयार केले जात आहे. गोव्यात तयार होणारं बनावट मद्याची विक्री  महाराष्ट्र राज्यात केली जात होती  असल्याचं तपासात समोर आले आहे. बनावट मद्याबाबतची माहिती समजल्याने या पथकामार्फत गोवा राज्यात जाऊन बनावट देशीमद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा घालून बनावट देशी मद्य तयार करण्यासाठी लागणारा 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सीलबंद करण्यात आला आहे. झुल्फिकार ताज आली चौधरी व अमित ठाकूर आहेर या दोघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply