Pune Crime News : धक्कादायक! पुण्यात जन्मदात्या बापाकडून मुलीवर धारदार शस्त्राने वार, परिसरात खळबळ

Pune Crime News : पुण्याच्या वाघोलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वाघोलीत जन्मदात्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील वाघोलीत वडिलांकडून मुलीवर धारधार शस्त्राने वार केला आहे. जन्मदात्या बापाने अक्षरशः स्वतःच्या मुलीवर कुऱ्हाडीने डोके, हात-पायावर वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

Jayant Patil : ''मी गरीब माणूस, माझा कुणाशीही वाद नाही'', अंतर्गत कलहाच्या चर्चांवर जयंत पाटील काय म्हणाले?

या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. अक्षदा फकीरा दुपारगुडे असं पीडित मुलीचं नाव आहे.

पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत जन्मदात्या बापाने मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या मावशीच्या फिर्यादीवरुन लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *