Pune Crime News : पुण्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 1 कोटींचा दारुसाठा जप्त; दोघांना अटक

Pune Crime News :  राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे या पथकाने गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने तब्बल 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.  पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ ही करावाई करण्यात आली. काल रात्री ही कारवाई करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग, पुणे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक चरणसिंग राजपूत व उपअधीक्षक संजय आर. पाटील, युवराज शिंदे व एस. बी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आली. पथकाला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर पथकाने 1 जानेवारी 2024 रोजी खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहन तपासणी सुरू केली. त्यांचे लक्ष दहाचाकी कंटेनरकडे वेधण्यात आलं. तपासणीदरम्यान संशय आल्याने कसून शोध घेण्यात आला. चौकशी केली असता चालकाच्या प्रतिसादामुळे संशय निर्माण झाला आणि पथकाने सविस्तर तपासणी केली. गाडीच्या पुढील बाजूस ठेवण्यात आलेल्या पेंट कॅनमध्ये एक हजारांहून अधिक लपवलेले दारूच्या बाटल्या आढळून आल्याचं पोलिसांनी संगितलं आहे. 

Police Suspended : थर्टी फस्टची ड्युटी सोडून मारली दांडी; कर्तव्यात कसूर करणारे सात पोलीस कर्मचारी निलंबित

जप्त करण्यात आलेली दारू गाडीच्या किमतीसह तब्बल एक कोटी रुपये किमतीची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे चालकाकडे आवश्यक वाहतूक पास, परवाना किंवा मद्याच्या कायदेशीर वाहतुकीशी संबंधित कोणतीही संबंधित कागदपत्रे नव्हती. तस्करीप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply