Pune Crime : पाय धुतलेले पाणी प्या, परीक्षेत यश मिळवा... महिलेने तरुणाला घातला दीड लाखांचा गंडा; 'अंनिस'कडून भांडाफोड

Pune Crime : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुसंस्कृत, पुरोगामी पुणे शहरातून फसवणूकीचा अजब प्रकार समोर आला आहे. परिक्षेत यश मिळवण्यासाठी तांत्रिक महिलेकडून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाची दीड लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये वृषाली संतोष ढोले-शिरसाठ या मांत्रिक महिलेसह साथीदार माया गजभिये आणि सतीश वर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Dharavi Project : मविआ सरकारच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पासाठी निविदा अटी अंतिम झाल्या, अदानी समूहाकडून खुलासा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पुण्यातील पाषाण परिसरातील उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार सुरू होता. वृषाली ढोले-शिरसाठ ही युवती लोकांना वेगवेगळी आमिषे दाखवून फसवणूक करत होती. या महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, पोलीस आणि पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केला आहे

स्पर्धा परीक्षेतील यशासाठी नैराश्य घालवू, असे आमिष दाखवत वृषाली ढोले-शिरसाठ या मांत्रिक महिलेने जादूटोणा करून संबंधित तरुणास स्वतःचे पाय धुतलेले पाणी पिण्यास भाग पाडले. तसेच या युवकाची तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला.

फसवणूक झाल्याप्रकरणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पाषाण परिसतील 23 वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. तरुणाच्या तक्रारीनंतर तांत्रिक महिलेसह तिघांविरोधात जादूटोणा विरोधी कायदा कलम 3(2) आणि भारतीय दंड विधान संहिता कलम 420, 506(2), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply