Pune Crime : नंबर प्लेट नसल्याने संशय आला अन्.. पुण्यात बाईक चोरी करणाऱ्या तिघांना अटक; १५ दुचाकी जप्त

Pune Crime : दुचाकीला नंबरप्लेट नसल्याच्या संशयावरून तपास करत बाईक चोरी करणाऱ्या तिघांना पुण्यातील कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांकडून तब्बल १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला होता. हा तपास सुरू असतानाच निखिल राक्षे या तरुणाकडे नंबरप्लेट नसलेली दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Pune News : पैशांचा पाऊस! भोंदू बाबाने तरूणाला लावला 18 लाखाचा चुना, पुण्यातील हडपसरमधील प्रकार

यावरुन संशय आल्याने पोलिसांनी निखिल राक्षेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच चौकशीदरम्यान आरोपी राक्षेने साथीदार सागर आणि गणेश यांच्या मदतीने दुचाकी चोरल्याचे कबुल केले. त्यानंतर त्याच्या दोन साथिदारांनाही अटक करण्यात आली. या तिघांच्या ताब्यातून १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

निखिल सुनील राक्षे (वय २५, रा. प्रेमनगर, मार्केट यार्ड), सागर शिवाजी गुंजले (वय २१), गणेश भरत मोहिते (वय २८, दोघे रा. माण, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिनही आरोपींनी मिळून कोंढवा, वानवडी, राजगड, माणगाव, वाठार आणि सासवड परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच या आरोपींंनी अजून कुठे असे गुन्हे केले आहेत का? याचा तपास कोंढवा पोलीस करत आहेत. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *