Pune Crime : पाच अल्पवयीन मुलांकडून तरुणाची दगडाने ठेचून हत्या; थरारक घटनेनं पुण्यात खळबळ

Pune Crime News : पुण्यात सातत्याने गुन्हेगारी विश्वातील घटनांमध्ये वाढ होत आहे. आता देखील एक विचित्र घटना समोर आलीये. किरकोळ वादातून पाच अल्पवयीन मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. हडपसरमधील रामटेकडी परिसरात शुक्रवारी रात्री एक ते तीनच्या दरम्यान ही घटना घडलीये. 

महादेव रघुनाथ मोरे (वय २६, रा. काळेपडळ, हडपसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. वानवडी पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन पाच मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव आणि अल्पवयीन ५ मुलं एकमेकांना आधीपासून ओळखत होते. यातील एक मुलगा शाळेत शिक्षण घेत आहे. तर बाकीचे हाताला मिळेल ते काम करुन आपलं पोट भरतायत. तसेच मृत महादेव हा एक खासगी कंपनीत कामाला होता.

Jalna Maratha Andolan : जालन्यातील प्रकरणावर सरकारकडून कारवाईला सुरुवात; जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव आणि अल्पवयीन ५ मुलं एकमेकांना आधीपासून ओळखत होते. यातील एक मुलगा शाळेत शिक्षण घेत आहे. तर बाकीचे हाताला मिळेल ते काम करुन आपलं पोट भरतायत. तसेच मृत महादेव हा एक खासगी कंपनीत कामाला होता.

काही दिवसांपूर्वी ही मुलं आणि महादेव भेटले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. मुलांना या गोष्टीचा फार राग आला. त्यांनी आपल्या मनात रागधरत पुन्हा महादेवची भेट घेतली. यावेळी हे सर्वजण रामटेकडी परिसरातील ढेरे कंपनीजवळ डोंगरावर मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी गेले. तिथे असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामरीत होऊन मुलांनी त्याला मारहाण करत दगडाने ठेचले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply