Pune Crime : पुण्यात 'मुळशी पॅटर्न'ची पुनरावृत्ती, १० ते १२ जणांच्या टोळीकडून तरुणाची निर्घृण हत्या; कुटुंबीयांचा आक्रमक पवित्रा

Pune : पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा (Pune Police) धाक राहिला नसल्याचे चित्र पुण्यामध्ये वारंवार पाहायला मिळत आहे. अशामध्ये पुण्यामध्ये मुळशी पॅटर्न सारखी घटना समोर आली आहे. १० ते १२ जणांच्या टोळक्याने एका तरुणाची तलवारीने वार करुन निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. मृतकाच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मंगला टॉकिजच्या बाहेर मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास हा खुनी थरार घडला आहे. १० ते १२ जणांच्या टोळीने एका तरुणावर तलवार, पालघन, काठ्या, लोखंडी गजने सपासप वार करुन त्याची हत्या केली. नितीन म्हस्के असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sharad Pawar : आज बीडमध्ये शरद पवारांची तोफ धडाडणार; 27 ऑगस्टला अजित पवारांची उत्तर सभा

या घटनेनंतर नितीन म्हस्केचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत नितीनचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्याच्या नातेवाईकांनी घेतली आहे. याप्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलिसांकडून सुरु आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हा सगळा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नितीन म्हस्के याचे काही दिवसांपूर्वी कोरेगाव पार्कमध्ये आरोपींसोबत कुठल्यातरी कारणावरून भांडण झाले होते. यावेळी नितीन म्हस्केने आरोपींपैकी एकावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तो तरुण जखमी झाला होता. याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी नितीन म्हास्केची हत्या करण्याचा कट रचला आणि त्याला संपवले. सागर कोळणटी, मलिक कोल्या, इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सुर्यवंशी, बाबा आवले, आकाश गायकवाड अशी आरोपींची नावं आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply