Pune Crime : धक्कादायक! पुण्यातील मंगला टॉकीजबाहेर तरूणाचा निर्घृण खून; चित्रपट पाहून बाहेर येताच कोयते, तलवार, दगडाने ठेचले

Pune Crime : गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोयता गँगची दहशत होती, त्यानंतर आता टोळक्याने तलवार आणि कोयत्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील मंगला टॉकीजसमोर तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

ही घटना मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तरुण चित्रपट पाहून बाहेर येताच टोळक्याने तलवार आणि कोयत्याने तरुणावर हल्ला केला व दगडाने ठेचून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नितीन मोहन म्हस्के (वय २६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नितीन म्हस्के हा मंगळवारी रात्री शिवाजीनगर परिसरातील मंगला टॉकीज या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी पूर्व वैमनस्याच्या वादातून एका टोळक्याने त्याच्यावर कोयते, तलवार आणि दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली आहे. मृत नितीन म्हस्केवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याच वादातून त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Samruddhi Expressway Accident : गाढ झोपेत मित्रांचा मृत्यूच्या वाटेवर प्रवास; समृद्धीवरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

दरम्यान काही दिवसांपूर्वी मृत नितीन मस्के व त्याच्या साथीदारांनी मिळून आरोपी सागरवर किरकोळ वादातून शस्त्राने हल्ला केला होता. यावेळी आरोपी सागरला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा म्हस्के आणि त्याच्या साथीदारांवर दाखल करण्यात आला होता. मात्र, या भांडणाच्या रागातून आरोपी नितीनच्या मागावर होते.

मंगळवारी रात्री नितीन म्हस्के चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर आला त्यानंतर अचानक त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेत नितीन म्हस्केचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. तर संबधीत घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply