Pune Crime : शिवाजीनगर परिसरात नदीत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; शहर परिसरात खळबळ

Pune Crime News : पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील नदीमध्ये एक तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. शिवाजीनगर ब्रीजखाली हा मृतदेह आढळला असून याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरातील ब्रीजखाली आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. याबाबतची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह पुरुष व्यक्तीचा असून त्याचे वय 55 ते 60 च्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai-Goa Highway : निवळी घाटात दरड कोसळली, मुंबई -गोवा महामार्गावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा

तसेच या व्यक्तीच्या डोक्याला मार लागलेला असून गुडघ्यालादेखील जखम झाली आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटली शकलेली नसून ही हत्या आहे का आत्महत्या याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply