Pune Crime : पुण्यात ताडी पिऊन तरुणाचा मृत्यू; महिलांचा रुद्रावतार, बाटल्यांसह अवैध दारु विक्रेत्यांचे दुकानं फोडली

Pune : अंगसुळे येथील विजय मारुती शेडगे (वय २४) या तरुणाचा ताडी पिऊन मृत्यू झाला असल्याची घटना शुक्रवारी (ता.२५) घडली असल्याचा आरोप गावातील महिलांनी केला. सर्व महिला एकत्र येऊन आक्रमक होत दारु व ताडी बंदच्या घोषणा देत अवैद्य दारु व ताडी विक्री करणाऱ्यांची दुकाने फोडून बनावट ताडीची केंद्र व दारुच्या बाटल्या फोडल्या. पोलिसांना वारंवार अर्ज करुनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने गावातील ताडी व दारु विक्री बंद केली नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

यावेळी गावातील सुष्मा राऊत, वंदना राऊत, नंदा शेडगे, रंजना राऊत, सुभद्रा राऊत, वैशाली राऊत, संजना दळवी, कुंदा राऊत, मंगल राऊत, सुमन राऊत, शांताबाई राऊत, सुमन राऊत, सुष्मा तावरे, सोपान राऊत, धोडीबा राऊत, आनंद राऊत, शिवाजी कंक, यशवंत कंक, बबन भगत, विठ्ठल सणस, अक्षय झुनगारे, भाऊसाहेब परखांदे, शशीकांत किरवे, रामचंद्र राऊत यासह गावातील तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Pavana Dam : पिंपरी चिंचवड, मावळवर पाणी टंचाईचे सावट; पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा

अंगसुळे येथे मागील ५० वर्षापासून ताडी विक्री सुरु असून आतापर्यत सांगवीसह अंगसुळे गावातील चारजण मृत्यूमुखी पडले आहेत. देशी व विदेशी दारु, गांजा विक्री तीन ठिकाणी होत असून एका ठिकाणी ताडी विक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कारी, अंगसुळे, सांगवी, कंकवाडी व भावेखल येथील तरुण येथे येतात व बनावट ताडी पिऊन तरुण व्यसनाधीन होत असून घरात भांडणतंटे वाढत आहेत. गावातील तरुण मरण पावल्यामुळे महिला आक्रमक होऊन ताडी व दारु विकणाऱ्यांच्या घरात घुसून अवैद्य ताडी व देशी विदेशी दारुच्या बाटल्या बाहेर काढून दारु बंदीची घोषणा देत बाटल्या फोडल्या आणि निषेध व्यक्त केला. यावेळी महिलांचा रुद्रावतार पाहायला मिळाला असून महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.

अंगसुळे येथे ताडी उत्पादन करण्याचा परवाना आहे. मात्र ताडी विक्री करायला परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात ताडी विक्री केली जात आहे. तर अवैद्य विनापरवाना देशी विदेशी दारु विक्री होत असुन याकडे उत्पादन शुल्क विभाग व भोर पोलीस कानाडोळा करत आहेत. आर्थिक व्यवहारातून पोलिस कारवाई करत नसल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखवले. अंगसूळे येथील अवैध धंदयामुळे कारी, सांगवी भिडे, भावेखल, अंगसुळे गावातील नागरिकांनी अवैद्य ताडी विकली जात व अवैद्य दारु केली जात आहे. तसेच आंबवडे खोर्यातील व वाई तालुक्यातील तळीराम येथून ताडी नेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितलं. अवैध धंद्याबाबत भोर पोलिसांना वेळोवेळी अर्ज करुनही पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. आजूबाजूच्या नागरिकांना दारु पिणाऱ्या लोकांचा नाहक त्रास सहन करवा लागतो. तर दारुच्या बाटल्या व फुगे याचे प्लास्टिक खाऊन जनावरे मरत असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले.

भोर तालुक्यात अंगसुळे, नांदगाव, निगुडघर, वाकांबे येथे मोठ्या प्रमाणात ताडी व बनावट दारु विक्री सुरु आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग व भोर पोलीस दुर्लक्ष करत आहेत.यामुळे अवैद्य धंद्यात दिवसेंदिवस वाढ होत असून याचा मोठा परीणाम होय असून हे धंदे बंद झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावातील महिलांनी दिला आहे.

आमदार शंकर मांडेकर यांनी आढावा बैठकीत अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना देऊनही अवैध धंदे सर्रासपणे सुरु असून तरुणांचा जीव जात असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रशासनाचा अंकुश नसल्याचं दिसून येत आहे. आर्थिक व्यवहारातून या अवैध धंद्यांना अभय मिळत असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply