Pune Crime News : घरात घुसला, फोन हिसकावला अन्...; पुण्यात गॅस सिलेंडर डिलिव्हरी बॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग


Pune Crime News : पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस डेपोत शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. गॅस सिलेंडर डिलिव्हरी बॉयकडून १४ वर्षीय मुलीचा विनयभंग झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडरचे वितरण करण्यासाठी १९ वर्षीय डिलिव्हरी बॉय पीडित मुलीच्या घराजवळ आला होता. पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून आरोपीने तिच्यावर विनयभंग केला. हा प्रकार कोणालाही सांगितल्यास बघून घेईन अशी धमकी देखील आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला दिली.

Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद

गॅस सिलेंडर घरी देण्यासाठी आलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश करुन तिच्याशी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीने पीडितेला धमकावून तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तिच्या मोबाईलवरुन स्वत:च्या मोबाईलवर हाय असा मेसेज पाठवला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला बघून घेईल अशी धमकी आरोपीने दिली.

पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये गॅस सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. घडलेल्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे लोक म्हणत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply