Pune : बलात्कार नाही, व्यवहार होता? दत्ता गाडेच्या वकिलांचा दावा

Pune Crime : स्वारगेट बलात्कार प्रकरणी नराधम दत्ता गाडेला अटक केल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालंय.. दत्ता गाडे आणि पीडित तरुणीमध्ये सहमतीने संबंध झाले मात्र पैशांच्या वादातून हे प्रकरण घडल्याचा दावा नराधम गाडेच्या वकिलांनी केला.. तर त्याचीच री ओढत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी धक्कादायक दावा केलाय. स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या 70 तासानंतर पोलिसांनी मध्यरात्री आरोपी दत्ता गाडेच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर गाडेला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी गाडेच्या वकिलांनी धक्कादायक दावे केले आहेत.. ते नेमके काय आहेत?

Pune : ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांचं निधन; साहित्य क्षेत्रावर शोककळा

नराधम गाडेच्या वकिलांचे खळबळजनक दावे
- आरोपी आणि पीडितेची महिनाभरापासून ओळख
- आरोपीने कुठलीही बळजबरी केली नाही
- पीडितेने बोलावल्यानेच आपण बसमध्ये गेल्याचा दावा
- आरोपीने तरुणीला साडेसात हजार दिल्याचा दावा
- तो बलात्कार नाही तर व्यवहार असल्याचा युक्तीवाद
- तिथं तरुणीचा एजंटही असल्याचा दावा
- पैशांच्या वादातून तरुणीने आरोप केल्याचा युक्तीवाद
- पीडिता आणि आरोपीचे कॉल रेकॉर्ड काढण्याची मागणी

वकीलांच्या युक्तीवादानंतर गाडेच्या पत्नीनेही पीडितेवर गंभीर आरोप करत आरोपीची पाठराखण केलीय. नराधम दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.. त्यामुळे या प्रकरणात पोलीस सत्य शोधून काढतीलच. मात्र त्याआधीच राजकीय नेत्यांकडून पीडितेच्या चारित्र्यावर करण्यात येत असलेली ही चिखलफेक मात्र योग्य नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply