Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड

Pune : फुरसुंगी - वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करून पळून जाणाऱ्या तरुणाला फुरसुंगी पोलिसांकडून अटक करण्यात आली. शनिवारी सायंकाळी ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची धिंड काढून पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला माफ करणार नाही असा संदेश दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिनाथ ऊर्फ बबलू भागवत मसाळ (वय-२५, रा. कोलवडी, मुरकुटे वस्ती, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आदिनाथ हा गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होता. यावेळी भेकराईनगर चौकात कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक (वय-४७, रा. जगताप नगर, वानवडी) यांनी त्याला अडवले आणि गाडी चावताना फोनवर बोलू नकोस असे सांगितले.

Raigad Accident : भरधाव आल्याने जोरात धडक, कंटेनर कारवर पलटी, एकाचा जागीच अंत; रायगडमध्ये भीषण अपघात

यावेळी दोघांच्यात शाब्दिक चकमक झाली. याचा राग मनात धरून आरोपीने रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून हवालदार नाईक यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले आणि घटना स्थळावरून पळून गेला.

गोपनीय माहितीद्वारे पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला उस्मानाबाद येथून अटक केली व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. असे फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply