Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली

Pune : पुण्यातील शिवाजीनगर परिसरात आज दोन आत्महत्यांच्या घटना समोर आल्या आहेत.यामध्ये एका घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. तर दुसऱ्या घटनेत शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातच एका तरुणाने गळफास घेतला आहे.

शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचारी दादा कोकणे यांचा मुलगा ऋषिकेश कोकणे याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सदर घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. ऋषिकेश याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयात डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून देखील अखेर ऋषिकेशचा दुपारी 3.30 वाजता मृत्यू झाला. आत्महत्येचं कारण अद्यापही समजू शकलं नाहीये, सदर घटनेचा पोलिस तपास करत आहे.

Mumbai Coastal Car Accident : भरधाव कार डिव्हायडवर आदळल्याने उलटली, पती-पत्नी गंभीर जखमी; मुंबईत भीषण अपघात

दुसऱ्या घटनेत शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या सोसायटी ऑफिसजवळील अशीच एक घटना घडली आहे. चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन सोहेल येणीघुरे (वय २८, रा.पाषाण)याने स्वतःचं जीवन संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही आत्महत्या घरगुती वादातून झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनांमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply