Pune : मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ख्रिश्चन प्रार्थनेची सक्ती; डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यांना बजरंग दलाकडून बेदम मारहाण

पुणे: तळेगावजवळील (ता. मावळ) आंबी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयामध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्यामुळे महाविद्यालयातील प्राचार्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. यासंदर्भातील चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे.

Pune Crime : प्राध्यापक महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढला, पतीकडे खंडणीत मागितले ५००० यूएस डॉलर

पुणे जिल्ह्यातील तळेगाव आंबी येथे डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचे महाविद्यालय आणि विद्यालय आहे. या महाविद्यालयातील मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे का लावले? आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना का घेतल्या जातात? हे दोन्ही आरोप करून प्राचार्य अलेक्झांडर रीड यांना मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमध्ये त्यांचे कपडे फाटल्याचे चित्रफितीमध्ये दिसत आहे. हा प्रकार लवकर थांबवा आणि प्राचार्यांची बदली करा अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply