Pune : क्रौर्याची परिसीमा! बाळाला रस्त्यावर फेकलं, रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तोंडाला बांधली पिशवी

Pune : पुण्यामध्ये नवजात बाळाला रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या वडगाव बुद्रुकमध्ये ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाळाचा रडण्याचा आवाज येऊ नये यासाठी त्याच्या तोंडाला पिशवी बंधण्यात आली होती. स्थानिक नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन पोलिसांकडे दिले. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिस बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात नवजात बालकाला जन्म देवून रस्त्यावर सोडून देण्यात आले. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीमधील ही घटना आहे. नवजात बाळाला रस्त्याच्या कडेला सोडून देण्यात आले होते. रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून नवजात बाळाच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती.

BEST Bus Accident : देवेंद्र फडणवीसांकडून ५ लाखांची मदत, बेस्ट अपघातप्रकरणी दोषींवर कारवाईचा आदेश

सोमवारी रात्री बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर त्यांना बाळ रस्त्याच्या कडेला सापडले. नागरिकांनी तात्काळ सिंहगड पोलिसांना संपर्क केला. सिंहगड पोलिसांनी नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. बालकाची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलिस नवजात बाळाच्या पालकांचा शोध घेतत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply