Pune Crime : प्लॅट फॉर्म २ वर बॉम्ब, पुणे स्टेशन उडवणार, दारूच्या नशेत पुणे पोलिसांना फोन

Pune Crime : पुण्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा पोलिसांना फोन आला अन् एकच खळबळ उडाली. पुणे शहर पोलिसांना रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आला होता. त्यानंतर पोलिसांची यंत्रणा तात्काळ कामाला लागली. फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दारूच्या नशेत त्यानं फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय.

पुणे रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवला असल्याचा पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. सकाळी 9 वाजता पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आल्याचा समोर आले. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपास करत त्याला ताब्यात घेतलेय. फोन करणार व्यक्ती वय 40 पिंपरी - चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असल्याची माहिती.

Ajit Pawar : अजित पवार यांना मोठा दिलासा, आयकरकडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त

या व्यक्तीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सदरील व्यक्तीने दारूच्या नशेत खोडसाळपणे फोन केल्याचं तपासात उघड झालेय. आपल्याकडे लोकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कॉल केल्याचं पोलिसांच्या तपासात त्या व्यक्तीने सांगितले. पिंपरी - चिंचवड पोलिसांकडून सदरील व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत.

पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब असल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव सागर भंडारी असे आहे. रावेत येथील किवळे गावठाण येथे तो राहतो. रावेत पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू पिल्यानंतर सागर यानं पोलिसांना फोन करून धमकी दिली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply