Pune Crime : पुण्यातील नराधमांना शोधण्यासाठी आता AIची मदत; आरोपीना पकडण्यासाठी जाहीर केले १० लाखांचे बक्षीस

Pune Crime : पुण्यातील बोपदेव घाटात युवतीवर बलात्कार प्रकरणानं संताप व्यक्त होतोय. या घटनेतील तीन नराधम पोलिसांना गुंगारा देत अद्याप मोकाट फिरतायेत. ५ दिवसांपासून पोलिसांच्या तपासाला पुर्णपणे अपयश आलंय. म्हणूनच आता आरोपींना शोधण्यासाठी १० लाखांचं बक्षिस जाहीर करावं लागलं.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत. ड्रग्ज तस्करी, कोयता गँगचा धुमाकूळ, हिट अँण्ड रनच्या घटनांनी पोलिसांच्या कर्तव्यावर बोट ठेवलं जातंय. पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनलाय. बोपदेव घाटात युवतीवर बलात्कार प्रकरणानं त्यात भर पडलीये. या घटनेतील तीन नराधम पोलिसांना गुंगारा देत अद्याप मोकाट फिरतायेत. ५ दिवसांपासून पोलिसांच्या तपासाला पुर्णपणे अपयश आलंय. म्हणूनच आता आरोपींना शोधण्यासाठी १० लाखांचं बक्षिस जाहीर करावं लागलं.

Pimpri Chinchwad Crime : किरकोळ वादातून भयानक कृत्य; छातीवर स्क्रू ड्रायव्हरने वार, रिक्षा चालकाचा मृत्यू

पुण्यातील २१ वर्षीय तरुणी तिच्या मित्रासह बोपदेव घाटात फिरायला गेली होती. तिथेच एका आरोपीने त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्याच्या इतर दोन मित्रांना बोलावून तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तिच्या मित्राला एका झाडाला शर्ट आणि पट्ट्याने बांधून ठेवले होते, अशी माहिती पीडित तरुणांनी पोलिसांनी दिली.

पुण्यातील बोपदेव घाटात युवतीवर बलात्कार प्रकरणात पोलिसांना आतापर्यंत आरोपींचे CCTV हस्तगत करण्यात यश मिळावे आहे. प्राप्त झालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचे स्केच तयारही करण्यात आले आहे. एवढेच नाही तर २०० पेक्षा अधिक संशयितांची पोलिसांनी चौकशी केली असून ३ हजार मोबाईल क्रमांकांची तपासणी झालेली आहे. सध्या पोलिसांनी पुण्यातील बोपदेव घाटात युवतीवर बलात्कार प्रकरणात आरोपींच्या शोधासाठी चक्क AIची मदत घेण्याची ठरवली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply