Pune Crime : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून १२ वर्षीय मुलीने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Pune : पिंपरी चिंचवडमध्ये रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून बारा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

पिंपरी चिंचवडमध्ये एका १२ वर्षीय मुलीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना ५ जून रोजी घडली होती. परंतु तिने असे टोकाचे पाऊल का उचलले? याचं कारण कोणालाही समजलेलं नव्हतं. त्यामुळे आई-वडिल चिंतेत होते. त्यामुळे या मुलीच्या वडिलांनी तिच्या मृत्यूनंतर परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यांनी तिचा मोबाईल देखील तपासला.

Pune Crime : बोपदेव घाट बलात्कार प्रकरण, संशयित आरोपींचे CCTV फुटेज समोर

परिसरातील सीसीटीव्ही आणि मोबाईल तपासल्यानंतर मुलीच्या पालकांच्या पायाखालील जमिन सरकली. तिला दोन रोड रोमिओ त्रास देत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मुलीने जीवन संपवल्याची खात्री तिच्या वडिलांना पटली. तिच्या फोनमधून देखील हे धक्कादायक वास्तव त्यांच्या समोर आलं. त्यानंतर या मृत मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

मुलीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवला. मुलीच्या वडीलाच्या तक्रारीवरून क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे या दोन आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केलीय. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठं दहशतीचं वातावरण आहे. शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply