Pune Crime : बोपदेव घाट बलात्कार प्रकरण, संशयित आरोपींचे CCTV फुटेज समोर

Pune Crime : पुण्याच्या बोपदेव घाटामध्ये एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पोलिसांनी दोन आरोपींचे स्केच जारी केले आहेत. सदर प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

सीसीटीव्हीमध्ये तीन संशयीत आरोपी दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, तीन व्यक्ती एका दुकानाबाहेर बाईकजवळ थांबले आहेत. ४ ऑक्टोबरच्या सकाळी १.३६ वाजताचा हा व्हिडिओ आहे. धक्कादायक घटना घडण्यापूर्वी काही तासांआधीचा हा व्हिडिओ आहे. ओरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही.

Nashik Crime : हटकल्याचा राग डोक्यात गेला, तरुणांच्या टोळक्याचा पोलीस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत बोपदेव घाटावर फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तीन व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी मित्राला त्याच्याच कपड्यांनी बांधले. त्यानंतर त्याला मारहाण देखील केली. त्यानंतर आळीपाळीने तिघांनी तरुणीवर बलात्कार केला,

पोलिसांच्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींकडे कोयता आणि बांबूच्या काट्या होत्या. त्यांनी तरुणीचे सर्व दागिने काढून घेतले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. कोणाला याबाबत सांगितलं तर याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी त्यांनी दोघांना दिली. त्यानंतर ते त्या ठिकाणाहून पळून गेले.

आरोपींनी घटनास्थळ सोडल्यानंतर तरुणीने आधी आपल्या मित्राला सोडवले. त्यानंतर दोघे तरुणीच्या घरी गेले. तरुणी आपल्या बहिणीसोबत राहत होती. त्यानंतर ते कोथरुडमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेले. तेथील स्टाफने त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यासंदर्भातील माहिती सकाळी पाच वाजता पोलिसांना दिली.

पोलिसांनी याप्रकरणी पीडितेच्या मित्राच्या वर्णनावरून दोन आरोपींचे स्केच जारी केले आहेत. पोलिसांनी 8691999689, 8275200947,9307545045 या तीन मोबाईल क्रमांकावर आरोपींची माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply