Pune crime : पत्नीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल; शिक्षक पतीला राग अनावर, बिहारी मित्राच्या मदतीने त्याचा काटा काढला

 

Pune Crime : पुण्यातून भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीचे आणि बॉयफ्रेंडचे फोटो व्हायरल झाल्याने पतीने त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुण्यातील बावधनमध्ये ही घटना घडली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आरोपी राजीवकुमार महतोसह साथीदार धीरजकुमार रमोदसिंगला अटक केली आहे.

आरोपी राजीवकुमार हा बिहारमध्ये शिक्षक आहे. राजीव कुमार आणि त्याच्या पत्नीचे घटस्फोटासाठी कोर्टात केस सुरू आहे. या सर्व तणावातून जात असताना पत्नीचे बॉयफ्रेंडसोबत व्हायरल झाले. या फोटोमुळे शिक्षक पतीचा राग अनावर झाला. त्यानंतर शिक्षक राजीवकुमारने प्रवीण कुमार महतोची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Pune : अखेर २८ तासांनी संपली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक, शेवटचा गणपती भवानी पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाचा

पुण्यातील बावधानमध्ये शिक्षक पतीने पत्नीच्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. राजीव कुमार असे आरोपीच नाव आहे. राजीव कुमार हा मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कलहामुळे तणावात होता. पत्नी गेल्या तीन- चार वर्षांपासून सोबत राहत नव्हती. त्यांची घटस्फोसाठी कोर्टात केस सुरू आहे. अशातच पत्नीचे बॉयफ्रेंड प्रवीण कुमार सोबतचे फोटो व्हायरल होत होते. ते फोटो राजीव कुमार याच्यापर्यंत आले होते. आधीच तणावातून जात असलेल्या राजकुमारने प्रवीण कुमारचा काटा काढण्याच ठरवलं.

प्रवीण कुमार हा त्याच्याच भावाच्या पुण्यात असलेल्या नर्सरीत पार्टनर म्हणून काम करत होता. राजीव कुमारने त्याच ठिकाणी काम करणाऱ्या बिहार येथील तरुणाला सोबत घेऊन पुणे गाठलं. मध्यरात्री एकच्या सुमारास झोपेत असलेल्या प्रवीण कुमारच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. हत्या केल्यानंतर शिक्षक असलेल्या राजीव कुमारने पळ काढला होता. परंतु , पोलिसांनी मुंबईच्या दिशेने जात असताना त्याला बेड्या ठोकल्यात. राजीव कुमार हा बिहारमध्ये एका प्राथमिक शाळेत शिक्षक असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply