
Pune Crime : पुण्यात आज दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर तिच्या एमपीएससी करणाऱ्या मित्रानेच कोयत्यानं हल्ला केला. दिवसाढवळ्या पुण्यातील सदाशिव पेठेत हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या हल्ल्यातून तरुणी थोडक्यात बचावली ती एका तरुणामुळेच. एकानं हल्ला केला, तर तिथून जाणाऱ्या दुसऱ्या तरुणानं प्रसंगावधान दाखवत तिचा जीव वाचवला.
पुण्यातील वर्दीळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेत ही घटना घडली. तरुणानं तिच्यावर कोयत्यानं हल्ला केला. त्यावेळी हल्ल्यात जखमी झालेली तरुणी जीव मुठीत घेऊन सदाशिव पेठेत पळत सुटली. तिला जीवेमारण्यासाठी हल्लेखोर तरुणही तिच्या मागे पळत होता. आजूबाजूचे लोक मात्र फक्त बघत उभे होते. तिचा बचाव करण्यासाठी कोणीच पुढे जात नव्हतं. तेवढ्यात तिथून जाणाऱ्या एका तरुणानं प्रसंगावधान दाखवलं आणि हल्लेखोर तरुणाच्या हातातून कोयता हिसकावला. धाडस करुन तरुणीचे प्राण वाचवणाऱ्या तरुणाचं नाव आहे लेशपाल जवळगे.
एकीकडे उपस्थितांनी बघ्याची भूमिका घेतली. दुसरीकडे मात्र लेशपालनं प्रसंगावधान दाखवत तरुणीचा जीव वाचवला. स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगेने आज धैर्य दाखवलं नसतं तर आज या तरुणीचा जीव गेला असता आणि पुन्हा एकदा दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असती.
कोण आहे लेशपाल जवळगे?
लेशपाल जवळगे आणि त्याच्या मित्राच्या प्रसंगावधानामुळे आज एका तरुणीचा जीव वाचला. लेशपाल जवळगे हा या प्रकरणात हिरो ठरला. लेशपाल जवळगे हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या आढेगावचा आहे. तो पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करते. त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं त्यानंतर एक वर्ष नोकरी केली आणि आता तो 2018 पासून पुण्यात MPSC चा अभ्यास करत आहे. त्याचे आई-वडिल आढेगावात शेती करतात.
कसा होता हल्ल्याचा थरार?
लेशपाल जवळगे रोजचं काम आटपून अभ्यासिकेत निघाला होता. रस्त्यात त्याला एक तरुणी पळताना दिसली. त्यानं मागे पाहिल्यावर एक तरुण तिच्यामागे कोयता घेऊन धावताना दिसला. हा सगळा प्रकार पाहून लेशपालनं आपली बॅग फेकली आणि थेट तरुणीचा बचाव करण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी तरुणीनं जवळच असलेल्या बेकरीत शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीला पाहून बेकरी मालकानं आपल्या दुकानाचं शटर खाली ओढलं, हे पाहून लेशपालनं त्या ठिकाणी जाऊन तरुणीवर होत असलेला हल्ला वाचवला. हल्लेखोर कोयता उगारुन तरुणीच्या डोक्यावर प्रहार करण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात लेशपालने थेट या तरुणाचा हात धरला आणि कोयता हिसकावला. त्यानंतर अनेक लोक जमली आणि तरुणीचा जीव वाचवला आणि तरुणाला थेट पोलिसांच्या हवाली केलं.
ही विकृती कमी झाली पाहिजे : लेशपाल जवळगे
"मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. गावाकडून अनेक मुलं पुण्यात शिक्षणासाठी येत असतात. अनेक स्वप्न घेऊन ते आलेले असतात. मात्र अशा घटना पाहून प्रचंड राग येतो. तरुण पीढी शिक्षणाच्या नावाखाली गुन्हेगार होताना दिसत आहे. ही विकृती कमी झाली पाहिजे, तरच मुली सुरक्षित राहतील आणि मुलींनीदेखील मैत्री करताना किंवा त्यांच्या आयुष्यात कोणतंही पाऊल उचलताना एकदा सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जेणेकरुन या तरुणांच्या मनात भीती निर्माण होईल आणि परिणामी हल्ले किंवा गुन्हे कमी होतील.", असं लेशपाल जवळगे सांगतो.
प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून ही सगळी घटना घडली आहे. दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हापासून हा तरुण या तरुणीच्या प्रेमात होता. त्यानंतर तरुणीने प्रेमाला नकार दिला. याचा त्याला राग आला. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनीदेखील तरुणाच्या घरी हा प्रकार सांगितला होता. तरुणाच्या आईने त्याला समजावलंदेखील होतं. मात्र घरापर्यंत माहिती गेल्यानं त्याचा राग अनावर झाला आहे. त्याने थेट तरुणी कॉलेजला जात असताना तिच्यावर हल्ला केला.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

