Pune : घोरपडे पेठेतील गुंड जंगल्या सातपुतेचा खुनाचा कट उधळला, एन्जॉय ग्रुपच्या सातजणांना अटक; सात पिस्तुलांसह २३ काडतुसे जप्त

Pune : स्वारगेट भागातील गुंड कुणाला पोळ याच्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विशाल उर्फ जंगल्या सातपुते याच्या खुनाच्या तयारीत असलेल्या सातजणांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून सात पिस्तुले आणि २३ काडतुसे जप्त केली. ऐन गणेशोत्सवात सातपुतेचा खून करण्याचा कट आरोपींनी रचला होता. पाेलिसांच्या तत्परतेुमळे आरोपींचा कट उधळला गेला.

शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७), सुमित उत्तरेश्वर जाधव (वय २६), अमित म्हस्कु अवचरे (वय २७), ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४), अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७), राज बसवराज स्वामी (वय २६), लतिकेश गौतम पोळ (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी स्वारगेट आणि लोहियानगर भागात राहायला आहेत.

Pune Politics : पुण्यात भाजपला मोठा धक्का; माजी आमदार फुंकणार तुतारी, प्रचारही केला सुरू

सासवड येथून दहिहंडीचा कार्यक्रम संपवून घरी निघालेल्या गुंडावर हल्ला करण्यात आला होता. गुंडावर सुमीत जाधव आणि साथीदारांनी हल्ला केल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. सुमीत स्वारगेट परिसरातील एन्जाॅय ग्रुपचा सदस्य आहे. शंकरशेठ रस्ता परिसरातील एका हाॅटेलमध्ये स्वारगेट भागातील गुंड कुणाल पोळ याचा पाच ‌वर्षांपूर्वी खून झाला होता. विशाल उर्फ जंगल्या सातपुतेच्या साथीदारांनी पाेळ याचा खून केला होता.

खूनाचा बदला घेण्याच्या तयारीत आरोपी सुमीत जाधव आाणि साथीदार होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली साेनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, संदीप तिकोणे, कैलास साळुंके, स्वप्नील जाधव, अजित फरांदे, सागर जगताप आणि पथकाने कारवाई करून आरोपींना पकडले. त्यांच्याकडून सात पिस्तुले आणि २३ काडतुसे जप्त करण्यात आली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply