Pune : वनराज आंदेकर यांच्या हत्येचं धक्कादायक कारण उघड; गोळीबाराचा VIDEO आला समोर, तिघांना अटक

Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत त्यांची हत्या करण्यात आली. पुण्यातील नाना पेठ परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तातडीने तपासाची चक्रे फिरवत तिघांना अटक केली आहे.

आदेश वनकर यांच्या हत्येचं धक्कादायक कारणंही समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयांनीच वनकर यांच्यावर गोळीबाद केला. कौटुंबिक वाद आणि पैशांच्या वादातून आरोपींनी त्यांची हत्या केली. सध्या पुणे पोलीस तिन्ही आरोपींची कसून चौकशी करीत आहेत.

Mumbai Accident: लालबागमध्ये भीषण अपघात, मद्यधुंद प्रवाशाचा थिल्लरपणा, बसने ९ जणांना चिरडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते. रविवारी संध्याकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते नाना पेठ परिसरात उभे होते. यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी आंदेकर यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी परिसरातील लाईट देखील घालवली होती. हल्ला झाला त्यावेळी आंदेकर हे एकटेच होते. घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्यानं वार केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply