Pune Crime News : बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या वडिलांचा खून

Pune News : आंतरधर्मीय तरुणाने बहिणीस पळवून नेल्याच्या रागातून तिच्या भावाने मुलाच्या वडिलांवर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजता येरवडा येथील राजीव गांधी नगर परिसरा घडली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या भावासह दोघांना अटक केली.

कठाळू कचरूना लहाडे (वय ६०, रा. राजीव गांधी नगर, येरवडा) असे खून झालेल्या व्यत्तत्रिचे नाव आहे. याप्रकरणी इस्माईल रियाज शेख (वय २४), संकेत उमेश गुप्ता (वय २१, दोघेही रा. राजीव गांधी नगर, देरवडा) याना अटका करण्यात आली आहे.

Pune Traffic : अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; शिवाजी रस्ता राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

याबाबत लहाडे यांचा मुलगा धम्मकिरण लहाडे (वय २५) वाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील राजीव गांधीनगरमध्ये लहाडे व शेख कुटुबीच राहतात कठाक याचा मुलगा योगेश लहाने (वय २४) याचे इस्माईलच्या बहीणीसमवेत प्रेमसंबंध होते.

त्यातूनच दोघांनीही पळून जाऊन नुकतेच लग्न केले होते. त्याचा राग इस्माईलच्या मनात होता. सोमवारी दुपारी दीड वाजता इस्माईल व त्याचा मित्र संकेत गुप्ता हे दोघे कठाळू यांच्या घराजवळ आले. दोघानी कठाळू लहाडे यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने लहाडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शेरवडा पोलिस घटनास्थळी पोहचले. या घटनेनंतर पोलिसांनी इस्माईल व संकेत या दोघांना तत्काळ अटक केली.

बहिणीला पळवून नेल्यामुळे तरुणाने मुलाच्या वडिलांवर कोयत्याने वार करून खून केला. या घटनेतील आरोपीना तत्काळ अटक केली आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply