Pune Crime : पुणे हादरलं!अल्पवयीन मुलीवर बापासह, चुलता अन् भावाकडून लैंगिक अत्याचार, हडपसर परिसरातील घटना

Pune : पुण्याच्या हडपसरमध्ये धक्कादायक घटना घडली. अल्पवयीन मुलीवर वडील, काका आणि भावाने बलात्कार केला आहे. हडपसरच्या मांजरी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा हडपसर पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नात्याला काळीमा फासणारी ही घटना हडपसरच्या मांजरी परिसरामध्ये घडली आहे. १३ वर्षीय मुलीवर तिच्याच वडील, काका आणि चुलत भावाने बलात्कार केली. हा सर्व प्रकार जुलै २०२२ ते १० जून २०२४ या कालावधी दरम्यान घडला. पीडित मुलीने यासंदर्भात आईकडे तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत तिघांविरोधात तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वडील, चुलत भाऊ आणि चुलत्याविरोधात गुन्हा दाखल केला. हे कुटुंब परप्रांतीय असून कामानिमित्त पुण्यात राहते.

Latur News : हात पाय ताेडण्याची भाषा करत 25 ते 30 जणांकडून पोलिस उपनिरीक्षकास बेदम मारहाण

हडपसर पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड विधान ३७६, ३७६ (आय), ३२३, ५०६, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आई, वडील, काका आणि चुलत भाऊ यांच्यासोबत हडपसरच्या मांजरीमधील घुलेनगर परिसरात राहते. जुलै २०२२ मध्ये चुलत भावाने तिच्यावर बलात्कार केला होता. मुलगी घरामध्ये एकटी असल्याचा फायदा घेत त्याने लोखंडी रॉडचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित मुलीने ही गोष्ट कोणाला सांगू नये यासाठी त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये मुलीच्या काकाने तिच्यावर बलात्कार केला होता. मुलगी घरामध्ये एकटी झोपली होती त्यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेलेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी जबरदस्तीने तिचे चुंबन घेत तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला तेव्हा ही घटना उघडकीस आली. वडील दररोज त्रास देत असल्याचे देखील पीडित मुलीने पोलिसांना सांगितले.हडपसर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply