Pune Crime News : नऱ्हेत पकडला दीड कोटीचा गुटखा

Pune Crime News : नऱ्हेत परिसरात असलेल्या खाडेवाडीमधील एका गोडाऊनवर छापा टाकून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल एक कोटी ३९ लाखाचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी चौघांना अटक केली असून एकाचा शोध घेण्यात येत आहे.

पुष्पद अकबाल सिंग (वय २७), सुनील पथ्थन सिंग (वय ४५, दोघेही रा. नन्हे, मूळ. रा. उत्तरप्रदेश), मुकेश कालुराम गेहलोत (वय २८, रा. आंबेगाव, मूळ. रा. राजस्थान) आणि चंदन अजयपाल सिंग (वय ३२, रा. नन्हे. मूळ. रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, आरोपींचा साथीदार नीलेश ललवानी (वय ४०, रा. नते। याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत ४२ वर्षीय पोलिस अंमलदाराने सिहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Mumbai-Pune Highway : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

जप्त करण्यात आलेल्या साहित्यात काही कच्चा माल देखील आहे. त्यामुळे आरोपी येथे गुटखा तयार करत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी येथून पोलिसांना धागेदोरे मिळाले असून याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात गुटख्याचे पदार्थ विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील छुप्या पद्धतीने सरांस गुटखा विक्री केली जाते. पुणे शहरात देखील गुटखा विक्रेत्यांचे मोठे जाळे असल्याचे पोलिसानी यापूर्वी वेळोवेळी केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. मात्र, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यानी अशा अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेकडून शहर परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.

दरम्यान, शनिवारी (ता. १५) रात्री नन्हे भागातील खाडेवाडी येथे एका गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा असून त परिसरात गुटखा वितरित होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार युनिट दोन, सामाजिक सुरक्षा विभागासह इतर पथकांनी या गोडाऊनवर छापा टाकला. त्यावेळी येथे गुटख्याचा मोठा साठा आढळून आला

तब्बल २२७ पोत्यांत होता गुटखा

पोलिसानी येथून आरएमडी गुटख्याची २०७ पोती आणि चौकीदार गुटख्याची २० अशी २२७ पोती जप्त केली त्याची एकूण किमत एक कोटी ३१ लाख रुपये आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल डोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply