Pune Crime News : भयंकर! पत्नीला गोड बोलून लॉजवर नेलं अन्... तरुणाच्या कृत्याने पुणे हादरलं

Pune Crime News : कौटुंबिक वादातून पतीने धारदार शस्त्राने वार करत पत्नीची हत्या केली. त्यानंतर लॉजला कुलूप लावून पळून गेला. ही धक्कादायक घटना पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. काजल कृष्णा कदम (वय २७) असं मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काजल आणि कृष्णा पती-पत्नी असून ते दोघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. आरोपी कृष्णाला दारुचे व्यसन असल्याने त्याचे नेहमी काजलशी वाद व्हायचे. शनिवारी दुपारच्या सुमारास कृष्णाने भारती विद्यापीठ परिसरात असलेल्या एका लॉजवर रुम बुक केली.

Pune Crime : सावत्र बापाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; अश्लील वर्तन करत दिले चाकूचे चटके, पुण्यातील धक्कादायक घटना

यावेळी पत्नी काजल सुद्धा त्याच्या सोबत होती. संध्याकाळी आरोपी कृष्णाने रुम लॉक केली आणि बाहेर निघून गेला. त्यानंतर एका मित्रांसोबत तो मद्यपान करत असताना मी पत्नीचा चाकूने वार करीत खून केल्याचं आरोपीने सांगितले. ही घटना कळताच आरोपीचा मित्र घाबरला.

त्याने थेट भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गाठलं आणि याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ लॉजवर धाव घेतली. यावेळी काजला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. पोलिसांनी तातडीने पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने लॉजवर जाऊन चाकूने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपीने खून कशासाठी केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कौटुंबिक वादातून आरोपीने ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply