Pune : कोयता गँगनंतर रुमाल गँग सक्रिय; रात्रीच्या अंधारात वाहनांची तोडफोड

Pune : पुण्यात काही दिवसांपूर्वी कोयता गँगने मोठा धुमाकुळ घातला होता. रस्त्यावर राडा करत हातात कोयते घेऊन या गँगने सर्वांच्याच जीवाला घोर लावला होता. पुणे पोलिसांनी या गँगमधील अनेकांच्या मुसक्या आवळ्यात. अशात आता पुन्हा एकदा अशीच एक टोळी सक्रिय झाली आहे. 

पुण्यात तोंडाला रुमाल बांधून ६ जणांच्या टोळक्याने धुडगुस घातला आहे. परिसरात असेल्या चार चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. वनशिव झोपडपट्टी परिसरात ३० वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

पुण्यातील तुळजाई परिसरात दोन दिवसांपूर्वी अशी घटना घडली होती. काल रात्री पुन्हा एकदा येथील वाहनांवर दगडफेक करत काचा फोडण्यात आल्या आहेत. आज पहाटे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सहकारनगर पोलिसांकडून या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे.

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची  तोडफोड झाली आहे. काल वारजे परिसरामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. टोळक्यांनी वाहनांची तोडफोड करण्यामागे काय कारण असावे? ही कोयता गँग असून पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे का? की ही रुमाल गँग आहे? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *