Pune Crime : सहलीला जाणं पडलं महागात, चोरट्यांनी ४४ लाखांवर मारला डल्ला

Pune Crime : पुण्यामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पुण्यात घरफोडीचे सत्र वाढत चालले आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि विकेंडचे दिवस साधून अनेक जण कुटुंबीयांसोबत सहलीचे नियोजन करत आहेत. त्याचाच गैरफायदा चोरटे घेताना दिसत आहेत. पुण्यातल्या सिंहगड रोडवर राहणाऱ्या एका प्रख्यात डॉक्टरच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारत लाखो रुपयांची रोकड लंपास केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी संध्याकाळी सव्वापाच ते रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी डॉ. चंद्रकांत मधुसूदन आठल्ये (वय ६८, रा. सफलानंद सोसायटी, संतोष हॉलजवळ, आनंदनगर, सिंहगड रोड) यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली आहे.

Mumbai-Pune Highway : मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर हद्दीत कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. चंद्रकांत आठल्ये आणि त्यांचा मुलगा डॉ. सचिन आठल्ये हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. आठल्ये हे प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचा शिवाजीनगर येथील घोले रस्त्यावर दवाखाना आहे. ते रूबी हॉल क्लिनिक आणि अन्य रुग्णालयांमध्ये देखील वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून काम करतात. डॉ. आठल्ये यांचे भोर-वेल्हा परिसरात फार्म हाऊस आहे. या ठिकाणी ते नेहमीच आपल्या फॅमिलीसोबत जातात.

शनिवारी ते आपल्या कुटुंबीयांसोबत फार्म हाऊसवर गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घरात मोठी चोरी केली. रविवारी डॉ. आठल्ये कुटुंबीयांसोबत घरी परत आल्यानंतर त्यांना घरामध्ये चोरी झाली असल्याचे समजले. आठल्ये यांच्या घरातील बेडरुममधील कपाट फोडून चोरट्यांनी तब्बल ७८२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. या दागिन्यांची किंमत अंदाजे ४४ लाख १९ हजारांच्या आशपास आहे.

ही घटना डॉ. चंद्रकांत आठल्ये यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेच पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात भादवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply