Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील मुठा गावात पुणे पोलिस आणि गुन्हेगारामध्ये गोळीबाराचा थरार रंगला होता. कुख्यात गुंड नव्या वाडकरच्या गोळीबाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांचे गोळीबारानेच उत्तर दिले. आरोपीला पोलिसांनीनव्या वाडकरला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. नव्या वाडकर (१८ वर्षे) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. तो फरार होता असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस पथकं त्याच्या मागे होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुठा गावात सकाळी १० वाजता ही घटना घडली आहे. नव्या वाडकर हा मुळशी तालुक्यातील मुठा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाठलाग करत पोलिस त्याच्या मागावर होते. हा पाठलाग सुरू असतानाच वाडकरने पोलिसांच्या दिशेने एक गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल वाडकरच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. यातील एकही गोळी त्याला लागली नाही.
त्यानंतर नव्या वाडकरने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तर पुणे पोलिसांनी पाठलाग करून नव्या वाडकरला जेरबंद केले. पुण्यातील २००७ मध्ये पर्वती भागात जनता वसाहतीत निलेश वाडकर आणि सनी चव्हाण उर्फ चॉकलेट सुन्या यांच्या गुन्हेगारी टोळ्या होत्या. कधीकाळी वाडकर हा सनी चव्हाणचा एकदम खास मानला जायचा. मात्र काही दिवसांनी त्यांच्यात खटके उडाले आणि वाडकरने स्वतःची टोळी तयार केली.
काही वर्षांपूर्वी गोळीबार केल्याच्या प्रकरणात निलेश वाडकर याला अटक झाली होती. तुरुंगातून सुटून आल्यानंतर निलेश वाडकरचा सनीने खून झाला. या गुन्ह्यात फरार असलेल्या सनीला पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून निलेश वाडकरचा मुलगा असलेल्या नव्या उर्फ नवनाथ वाडकर याने जनता वसाहत परिसरात वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली होती. आज अखेर त्याला पोलिसांनी अटक केली. नव्या वाडकरविरोधात ७ गुन्हे दाखल आहेत.
शहर
महाराष्ट्र
- Eknath Shinde : पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार? एकनाथ शिंदे म्हणाले…
- Maharashtra :“अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करुन घेतला”; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले…
- ‘Manoj Jarange Patil on Kalicharan Maharaj : हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…”
- Satara : पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”
- Desh Videsh : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- New Delhi : दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
- Lucknow : ‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया