Pune Crime News : पुण्यासह मावळात मोठी कारवाई, हातभट्टी दारू अड्डयावर छापा; 1 कोटी 6 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime News : आरोग्यास हानी पोहोचवणाऱ्या गावठी हातभट्टी दारू अड्डयावर पुणे पाेलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पाेलिसांनी लाखो लिटर हातभट्टी दारू नष्ट केली. तसेच पाेलिसांनी एक कोटी सहा लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती दिली. दरम्यान मावळ येथे अवैधरित्या गावठी हातपट्टी दारू तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या ठिकाणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत एक लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.

मावळ मध्ये अवैद्यरित्या गावठी दारू बनवणाऱ्या भट्टीवर तळेगाव दाभाडेचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. तळेगाव दाभाडे परिसरात अवैधरित्या गावठी दारू बनवून ती विक्री केली जात होती.

Chakan News : मक्याच्या शेतात गांजाची लागवड; चाकण पोलिसांकडून साडेअकरा लाखाचा गांजा जप्त

मुठांवरे वेहेरगाव,आंबी अशा तीन गावांमध्ये ह्या अवैधरित्या गावठी दारू तयार करणे आणि विक्री करण्याच्या हातभट्ट्या होत्या. तळेगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सराफ यांना माहिती मिळताच त्यांनी तीन टीम तयार करून तिन्ही ठिकाणी छापा टाकला. सर्व हातभट्टी दारू तयार करण्याचा रसायन नष्ट केले.

दरम्यान पोलिसांची चाहूल लागतात गावठी हातभट्टी तयार करणारे मालक पसार होण्यात यशस्वी झाले. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाने ही कारवाई केली. एकूण तीन ठिकाणी छापा टाकून चार हजार 900 लिटर गावठी हातभट्टी दारू ज्याची किंमत एक लाख 88 हजार असून ती पूर्ण नष्ट करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply