Pune Crime News : बाहेर जाताना घराची चावी बुटात ठेवताय तर सावधान! आव्हाळवाडीत चार तोळे सोने व रोकड लंपास

Pune Crime News : वाघोली - घर बंद करून व चावी बुटात किंवा अन्य ठिकाणी ठेवून बाहेर जाताय तर सावधान. तुम्ही ही चोरांचे शिकार होवू शकता. असाच प्रकार शनिवारी दुपारी आव्हाळवाडी येथील प्रणिती कॉम्प्लेक्स मध्ये घडला. चोराने बुटातील चावी घेवून सदनिका उघडुन चार तोळे सोन्याचे दागिने व ४५ हजार रुपये रोकड लंपास केली

मिळालेल्या माहितीनुसार, या कॉम्प्लेक्स मधील चौथ्या मजल्यावर दोन तरुण एका सदनिकेत राहतात. दोघे जण कंपनीत कामाला असल्याने बाहेर जाताना ते बुटात चावी ठेवून जात होते. याचाच फायदा घेवुन चोरट्याने शनिवारी १२ वाजण्याच्या सुमारास बुटातील चावी घेतली. दरवाजा उघडला व सोन्याचे दागिने व रोकड वर डल्ला मारला. सुमारे साडे तीन लाख रुपयांचा हा ऐवज होतो.

Sushma Andhare : नारायण राणे मानसिकरित्या आजारी, उपचार घेऊन लवकर बरे व्हावे; सुषमा अंधारे यांचा नारायण राणेंवर निशाणा

सी सी टीव्ही फुटेज मध्ये एक अनोळखी तरुण त्या वेळी सोसायटीत आल्याचे दिसत आहे. त्याने तोंडाला रुमाल ही बांधला होता. नंतर तो काढल्याचेही दिसते. याबाबत सूरज कांबळे यांनी पोलीसात तक्रार केली आहे. पोलीसानीही घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *