
Pune Crime News: पुण्याच्या मावळमधून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. रविवारी मावळमधील गहुंजे येथे एका विवाहित तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने वार करत हत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या हत्याकांडाचा २४ तासांच्या आतच छडा लावला आहे. पतीची हत्या हल्लेखोरांनी केली नसून स्वतः पत्नीनेच पतीचा गळा चिरून खून केल्याचे समोर आले आहे.
अंकिता सूरज काळभोर, असे पतीचा खून केलेल्या पत्नीचे नाव असून सूरज काळभोर असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पती अंकिताचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. या सगळ्या गोष्टींचा अंकिताला या सगळ्या गोष्टींचा प्रचंड राग येत होता. त्या रागातूनच तिने पतीचा काटा काढल्याचं पोलीस तपासांत समोर आलं आहे.
अंकिताने अशी केली पती सूरजची हत्या
पतीकडून दररोज होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला पत्नी अंकिता कंटाळली होती. तिने पतीला संपवण्याचा प्लान आखला. यासाठी अंकिताने रविवारी (४ जून) सकाळी पतीला माहेरी म्हणजे गहूंजेला न्यायचं ठरवलं. तत्पूर्वी घरातील चाकू तिने सोबत घेतला होता.
ठरल्याप्रमाणे अंकिताने पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीतील येथून गोड बोलून पतीला मावळच्या गहूंजे येथील तिच्या माहेरी नेलं. तिथे गेल्यानंतर अंकिता पतीला घेऊन शेतात गेली. दरम्यान, अंकिताने लघुशंकेला जायचा बहाणा केला. थोडं नजरेआड जाऊन तिने पतीवर नजर ठेवली.
दबक्या पावलांनी आली अन् पतीचा काटा काढला
पती सूरज हा बेसावधअसल्याची खात्री केली अन् सोबत आणलेला चाकू बाहेर काढला. दबक्या पावलाने पतीजवळ जाऊन तिने मागून चाकूने गळा चिरला आणि जमिनीवर ढकलून दिले. त्यानंतर शेतातील टिकाव आणि दगड डोक्यात घातला. यात पती सूरज याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सूरजच्या हत्येनंतर अंकिताने बनाव रचला. चार ते पाच अज्ञातांनी अचानक हल्ला करत सूरजची हत्या केल्याचं अंकिताने पोलिसांना सांगितलं. मात्,र तिने सांगितलेल्या घटनाक्रमावर पोलिसांना संशय आला आणि उलट तपासणी करतच पत्नीचे बिंग फुटले. तळेगाव पोलिसांनी अंकिताला अटक केली आहे. पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

