Pune Crime News : पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने मागितली तीन कोटींची खंडणी; दोघांविरुद्ध गुन्हा

Murlidhar Mohol News: पुण्यात भाजपचे माजी महापौर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि त्यांचा मावसभाऊ रवी आटोळे यांच्या नावाने एका बिल्डरला तब्बल ३ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, पौड रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी पाटील, ताकवणे यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, त्यांच्या मावसभावाचा नावाचा वापर करून त्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली.

भारतीय जनता पक्षाच्या युवा माेर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहोचवू, अशी धमकी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी दिली.

आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला. हा प्रकार बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी संदीप पिरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रस्ता) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडे तपास करत आहेत. 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *