Pune Crime News : बदला घेण्यासाठी कट रचून 47 लाख लुटले, अवघ्या काही दिवसात पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

Pune News : कोयत्याचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे 47 लाख लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वी पुण्यात घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. जुना राग मनात ठेवत बदला घेण्यासाठी आरोपीने हा लुटीचा डाव आखल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे

समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक २ मार्च रोजी तारखेला सकाळी 11.30 वाजता दोन तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवून व्यापाऱ्यांचे 47 लाख रुपये लुटले होते. मंगळवार पेठ राहणाऱ्या मंगल पुरी बिकम पुरी गोस्वामी यांनी याबाबत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर समर्थ पोलीस याबाबत तपास करत होते. 

परिसरातील 500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरा चेक केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्यातील मास्टरमाइंड आरोपी ऋषिकेश गायकवाड याला अटक केले. ऋषिकेश आणि त्याचे दोन साथीदार किरण पवार व आकाश गोरख यांचा देखील या गुन्हामध्ये समावेश आहे.

पोलीस चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश गायकवाड हा 2019 पासून पन्ना एजन्सी गोरड इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये सेल्समन म्हणून हा काम करत होता. आरोपी ऋषिकेड गायकवाडला भांडण केल्यामुळे 2022 मध्ये कामावरून काढण्यात आले होते.

एजन्सीमधील दररोज 20 ते 25 लाखांपेक्षा जास्त रक्कम फिर्यादी भरण्यास जातो व त्याची बँकेत जाण्याचा वेळ माहित असल्याने आरोपीने हा प्लॅन तयार करत दरोडा घातला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply