पुणे पोलिसांची मोठी कारवाई! उत्तर प्रदेशच्या तोतया आमदार, मंत्र्यासह बनावट नोटा देणारी टोळी गजाआड

Pune Crime: उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार, मंत्री असल्याचा बनाव रचून लुबाडणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीने एका मार्बल व्यावसायिकाला ३० लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून ५ लाख ३४ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली.

या संदर्भात खराडी येथील ५४ वर्षीय व्यावसायिकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रूपाली राऊत, संजयकुमार पांडे, विकासकुमार रावत, समीर ऊर्फ विशाल घोगरे (चौघे रा. निलंगा, जि. लातूर) आणि अशोक पाटील (रा. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपाली राऊत, संजयकुमार पांडे आणि विकासकुमार रावत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची खराडी बायपास येथे २६ मार्चला रूपाली नावाच्या महिलेसोबत ओळख झाली. त्या वेळी या महिलेने आपण मंत्री आहोत, असे सांगून तिप्पट पैसे मिळवून देण्याची योजना सांगितली. तिने आरोपी पांडे हा उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार असल्याचे सांगून फिर्यादीचे बोलणे करून दिले. त्यांना पाच लाख रुपये दिल्यास त्याच्या मोबदल्यात ३० लाख रुपये परत मिळतील, असे सांगितले.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply